वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2023 अपडेट - स्प्रिंग बोर्ड पोर्टल वर येणाऱ्या तांत्रिक अडचणी संदर्भात माहिती

 

वरिष्ठ  व निवड वेतनश्रेणी  प्रशिक्षण 2023 अपडेट

स्प्रिंग बोर्ड पोर्टल वर येणाऱ्या तांत्रिक अडचणी संदर्भात माहिती 




वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणीची प्रशिक्षण पूर्ण करत असलेल्या शिक्षक बांधवांना पुढील प्रमाणे मेसेज दिसत आहे.


वरील मेसेज हा अनेक प्रशिक्षणार्थ्यांना दिसत असल्यामुळे हा स्प्रिंग बोर्ड वेब पोर्टलची तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात येते.

अशावेळी जर आपण मोबाईल वरून एप्लीकेशन वापरून प्रशिक्षण करीत असाल तर लॅपटॉप किंवा पीसीवर ब्राउझरवर लॉगिन करून प्रयत्न करून पहा.

किंवा मोबाईल मधील एप्लीकेशन आणि इन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून लॉगिन करून पहा.

किंवा आपल्या मोबाईलची किंवा पीसी ची ब्राउझर हिस्टरी क्लिअर करून लॉगिन करून पहा.



वरील सर्व प्रयत्न करूनही होत नसेल तर. 



वरील तांत्रिक अडचण दूर होण्यासाठी पोर्टल वरील हेल्पलाइनवर फोन करून अथवा ईमेल आयडी वर मेल करून सदर स्क्रीनशॉट स्प्रिंग बोर्ड ला पाठवावा त्यामुळे स्प्रिंग बोर्ड तांत्रिक अडचण दूर करून आपले प्रशिक्षण सुरळीत होईल.

Springboard-Support@Infosys.com

वरील मेलवर आपण आपली अडचण ईमेल करू शकता... 

सदर अडचणीमुळे प्रशिक्षण पूर्ण होईल की नाही? 

प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून मिळेल का? 

प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मागील वर्षीच्या अनुभवानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुरेसा वेळ व प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देईल.

ज्यांचे प्रशिक्षण अपूर्ण आहे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण नक्कीच करून घेण्यात येईल याबाबत कोणीही मनात शंका ठेवू नये.

वरील तांत्रिक अडचण ही सर्वांची तांत्रिक अडचण आहे त्यामुळे कोणीही एकट्याने घाबरून जाण्याची कारण नाही.

सदर तांत्रिक अडचण स्प्रिंग बोर्ड ने सोडवल्यानंतर आपले प्रशिक्षण सुरळीत सुरू होईल.

त्यासाठी आपण वारंवार लॉगिन करू नका काही विशिष्ट कालावधीनंतर पोर्टलवर लॉगिन करून पहावे.

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال