इसापनीती कथा I शेतकरी आणि ससाणा

 एक ससाणा एका कबुतराच्या मागे लागला होता. आणि तेवढ्यात तो एका शेतकर्‍याच्या जाळ्यात सापडला तेव्हा तो म्हणाला, 'दादा, मी काही तुझा अपराध केला नाही; तर तू मला सोडून दे.'

तेव्हा शेतकरी म्हणाला, 'तू माझा अपराध केला नाहीस, हे खरं पण मग त्या कबुतराने तरी तुझा काय अपराध केला होता ?'

जो न्याय तू त्याला लावलास तोच तुलाही लागू होतो तेव्हा मी तुला आता शिक्षा करणार !'

तात्पर्य

- इतरांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असेल तर आपणही आपली वागणूक सुधारायला हवी.

टिप्पणी पोस्ट करा

نموذج الاتصال