इसपनीती कथा I शेतकरी आणि रानडुक्कर

 एकदा एका शेतकर्‍याच्या जाळ्यात एक रानडुक्कर सापडले. तेव्हा त्याने त्याचा एक कान कापून सोडून दिले. काही दिवसांनी ते पुन्हा सापडले. तेव्हा त्याने त्याचा दुसरा कान कापून सोडले. परंतु, तरीही तिसर्‍या वेळेसही ते त्याच्या जाळ्यात सापडेल तेव्हा त्याने त्याला ठार मारून त्याचे डोके फोडले आणि तो म्हणाला, 'खरंच की याच्या डोक्यात मेंदूच नाही. जर अक्कल असती तर दोनदा माझ्या हाती सापडल्यावर पुन्हा तो माझ्या जाळ्यात आलाच नसता.'

तात्पर्य

- ज्याच्यावर उपदेशाचा अथवा शिक्षेचा काडीमात्र परिणाम होत नाही अशा माणसाला शहाणे करणे ही अशक्य गोष्ट आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

نموذج الاتصال