STARS प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 इयत्ता 5 वी व 8 वी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत...

 संकलित मूल्यमापन 2 आयोजनाबाबत महत्वपूर्ण सूचना
 STARS प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 
 इयत्ता 5 वी व 8 वी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत...




  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून 2023-24 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन 1 व संकलित मूल्यमापन - 2 अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता 3 री ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन 2 म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.संकलित मूल्यमापनचे आयोजन 02 ते 04 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

💥चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :-

💥 सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
चाचणीचे माध्यम व विषय: सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.

💥 चाचणीचा अभ्यासक्रम: द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल.

💥 चाचणीचे स्वरुपः- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल.

💥 चाचणी निर्मिती- सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.

💥 चाचणी कोणासाठी- संकलित मूल्यमापन -२ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल


💥 चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.

💥 शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.


💥 शिक्षकांनी चाचणीचे धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

💥 प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुण नोंद करावी.


💥 चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.


💥 मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.


💥प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन २ चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व खाजगी अनुदानित शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्या चाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.


💥 तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये शासन निर्णय राज्यमंडळाचा अभासक्रम राबविण-या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी लागू आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळानी राज्यस्तरावरून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणा- या नमुना सराव प्रश्नपत्रिकांचा वापर करून समांतर प्रश्नपत्रिका तयार करून इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा घ्याव्यात.


💥 शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित मुल्यामापन २ चे मूल्यमापन करावे. इयत्ता ५ वी व ८ वी वगळता उपरोक्त इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गासाठी चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत.


💥 प्राप्त गुणांची नोंद चॅटबॉटच्या माध्यमातून करणे :-


  चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या swift chat या app (चॅट-बॉट) वर तात्काळ करणेत यावी.
शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झालेनंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.


💥संकलित मूल्यमापन - 2 उद्देश 


१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे.


२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करणे,


३) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.


४) विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल.


  • 💥 संकलित मूल्यमापन - 2 चे वेळापत्रक :-


  •  प्रथम भाषा (सर्व माध्यम) - 02/04/2024

  •  गणित (सर्व माध्यम) - 03/04/2024

  •  तृतीय भाषा (सर्व माध्यम) - 04/04/202

महत्वाच्या अपडेट साठी 7875313385 हा माझा whatsapp नंबर तुमच्या जिल्ह्यातील शैक्षणिक ग्रुप वर अॅड  करा. 

Google search 

👇👇👇

JOIN EDUCATIONAL WP GROUP HERE
JOIN EDUCATIONAL  TG CHANNEL HERE

👇👇👇



👇👇👇  like,subscribe & share  👇👇👇



Youtube link  👉👉 https://www.youtube.com/channel/UCl2goxlFKgiGGgkzWnrpI_Q

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال