SSC Examination 2025 Result Update - दहावी परीक्षा मार्च 2025 निकालाबाबत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत सूचना! निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.
प्रकटन
विषय : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल
मंडळामार्फत मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक १३/०५/२०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org
६. https://www.tv9marathi.com
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे
विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल,
तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध
होईल.