यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे? टप्प्या टप्प्याने पाहूया. UDISE+ 2025-26 Student Promotion Update

 UDISE+ 2025-26 Student Promotion Update  

यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे? टप्प्या टप्प्याने पाहूया 



यु डायस २०२५-२६ प्रणालीबाबत महत्त्वाची सूचना


  • सर्वांना कळविण्यात येते की, सन 2025 26 या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठी शाळा स्तरावर ती टॅब ओपन करण्यात आला आहे, तरी सर्वांनी 30 जून 2025 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करून घेण्यात यावे. 

 
  • प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु डायस प्रणालीमध्ये अद्यावत करण्यात यावी. 

  •  यु-डायस प्लस पोर्टलवर 2024 25 सत्र मधील विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या मोबाईलवरून देखील आपण आपला वर्ग प्रमोट करू शकतो त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

https://sdms.udiseplus.gov.in/

  • लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये राज्य निवडून त्यासमोरील गो बटन वर क्लिक करा.

  • आपल्याला शाळेचे लॉगिन करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड टाकून त्याखाली सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर लॉगिन करायचे आहे लॉगिन यशस्वी झाल्यानंतर.

  • वरील प्रमाणे विंडो ओपन होते त्यामधील करंट अकॅडमी इयर 2024 25 वर क्लिक करा

  •  आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.

  • प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉडेलवर GO बटनावर क्लिक करावे

  • वर्ग आणि तुकडी निवडून GO बटनावर क्लिक करावे. 

  • नंतर आपल्याला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस मध्ये योग्य पर्याय निवडून व 2023-24 चे %, विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थित दिवस, शाळेत शिकत असल्यास Study in Same School निवडावे किंवा TC दिली असल्यास ते ऑप्शन निवडावे.

  •  याप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, ही प्रमोशनची प्रक्रीया पूर्ण करावी.

  • याच प्रमाणे इयत्ता 1 ली मध्ये सर्व नवीन प्रवेशित विदयार्थाना प्रवेश शाळांमध्ये दयावयाचे आहे.

  •  या नवीन प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांना त्यांच्या इतर कागदपत्रासोबतच विदयार्थ्यांचे आधारकार्ड बाबत विचारणा करावी. कारण सुरवातीलाच आधारकार्ड असेल तर पुढे सरल व युडायस मध्ये याची नोंद घेणे सोयीचे होईल.  

  • ज्या विदयार्थ्यांजवळ आधार नसेल त्यांना तात्काळ काढण्याच्या सूचना द्याव्यात. 

  • याच प्रमाणे शाळा सुरु होतच, विदयार्थांचे आधार पेंडिंग असल्यास ते काम तात्काळ पूर्ण करावे, कोणत्याही विदयार्थीचे आधार व्हॅलीडेशन पेंडीग राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • तसेच UDISE + मध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या A1 Form मध्ये BEO यांच्या मार्कीग व आवश्यक पुराव्यासह, जिल्हा कार्यालयास सादर करावे.




यु-डायस स्टुडन्ट पोर्टल विद्यार्थी प्रमोशन बाबत संपूर्ण माहिती पीडीएफ 




नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........



या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . 

Pls subscribe for more educational video.

 watch more and full videos

youtube.com/@rajangarud

https://rajangarud.com

https://www.facebook.com/rajan.garud/

https://www.instagram.com/?hl=en

https://twitter.com/RAJANGARUD2

join whatsapp group here 👉👉  

https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEc

cs8hjqOmZ

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال