परीक्षा पे चर्चा 2026 विदयार्थी, पालक व शिक्षक सहभाग नोंदवणे लिंक
Pariksha Pe Charcha (PPC) 2026
परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमाबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयातून दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित आदेशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संचानालयाच्या संदर्भ क्रमांक २ व ३ च्या पत्रान्वये परीक्षा पे चर्चा २०२६ (PPC-२०२६) साठी सहभागी होण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान https://innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता ६ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन MCQ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व सहभागीस सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना केंद्रशासनाच्या पत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) मध्ये जास्तीत जास्त विद्याथ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे, याकरिता सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. असे सूचित करण्यात आलेले होते.
महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमामध्य एकूण ६५,००,०००/- इतके विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तथापि, दिनांक २२/१२/२०२५ रोजी पर्यंत २,७८,५३५ जिल्हयामधून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत. असे संदर्भ क्रमांक ४ अन्वये सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. (जिल्हानिहाय दिनांक २२/१२/२०२५ रोजीचा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे सहभागाचा एकत्रित अहवाल सोबत जोडला आहे.)
सदरील बाबत परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमामध्य एकूण ६५,००,०००/- इतके विद्यार्थी,
शिक्षक व पालक सहभागी उद्दिष्ट साध्य होण्यासाठी https://innovateindia.mygov.in या पोर्टलवर नोंदणी उहिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांची राहील याची नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित जिल्हयातील मुख्याध्यापकांची व क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास पाठवावा.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे.
प्रत: माहितीस्तव सविनय सादर.
मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रति,
मुख्याध्यापक
सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यम
विषय : “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमात सहभागाबाबत"
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार “परीक्षा पे चर्चा” हा राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शनपर उपक्रम जानेवारी 2026 मध्ये आयोजित होणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना थेट मार्गदर्शन मिळणार आहे.
मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी सूचना :
1️⃣ शाळेतील *सर्व विद्यार्थ्यांना “परीक्षा पे चर्चा” उपक्रमाची माहिती* द्यावी व सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
2️⃣ ज्या विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे मोबाईल / इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न
➡️ वर्गशिक्षक / विषयशिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात घेऊन
➡️ संबंधित ऑनलाईन पोर्टल / नोंदणी प्रक्रियेमध्ये शिक्षकांनी स्वतः भरावेत.
3️⃣ प्रश्न संकलन करताना –
विद्यार्थ्यांचे *नाव, इयत्ता, विषय* स्पष्ट नमूद करावे
प्रश्न *परीक्षा ताण, अभ्यास पद्धत, वेळ व्यवस्थापन, आत्मविश्वास* इ. विषयांवर आधारित असावेत
4️⃣ मुख्याध्यापकांनी याबाबत शाळास्तरावर समन्वय साधून सर्व शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून द्याव्यात.
5️⃣ कोणताही विद्यार्थी केवळ साधनसुविधांच्या अभावामुळे या राष्ट्रीय उपक्रमापासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घ्यावी.
लिंक :
https://innovateindia1.mygov.in/ppc-2026/student-through-teacher-form/?lang=en
डॉ. सुचिता पाटेकर
उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे
फोन नंबर…9075488444
9421848783
परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमाबाबत शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांनी दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos
https://www.facebook.com/rajan.garud/
https://www.instagram.com/?hl=en
https://twitter.com/RAJANGARUD2
join whatsapp group here 👉👉