संचमान् संचमान्यता 2025-26 UPDATE संच मान्यता पोर्टलवर शाळांची संच मान्यता उपलब्ध झाली आहे.

 संचमान्यता 2025-26 UPDATE 

संच मान्यता पोर्टलवर शाळांची संच मान्यता उपलब्ध झाली आहे.  

SANCHMANYATA PORTAL UPDATE



शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालतून निर्गमित दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी च्या परिपत्रकानुसार सन 2025 - 26 संचालन मान्यता बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे. 


संदर्भ :-


1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2015/(प्र.क्र.16/15)/टीएनटी-2, दि.15.03.2024, दि. 19.09.2025 व दि.09.10.2025


2. शासन पत्र दि.21.02.2025 व दि. 26.03,2025


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये निर्गमित संच मान्यता सुधारित निकष तसेच शासन पत्र दि.21.02.2025 व दि.26.03.2025 मधील निर्देशानुसार दि.20.10.2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राहय धरुन सन 2025-26 च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या आहेत.सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका (यूजर मॅन्युअल) नुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संचमान्यता डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) करुन शाळांना उपलब्ध करुन दयाव्यात. ज्या शाळांची पायाभूत पदांबाबत (Base Post) अडचणी असतील त्या बाबत तात्काळ प्रतिसाद दयावा.


तसेच सर्व संचमान्यता दि. 15.01.2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यावयाच्या असल्यामुळे त्रटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणास यापूर्वी उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याची पडताळणी करून तात्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. व आपल्या जिल्हयातील सर्व शाळांची संचमान्यता दि. 15.01.2026 पर्यंत निर्गमित होईल या दृष्टीने आवश्यकती कार्यवाही करावी.

विहित केलेल्या कालमर्यादनंतर जिल्हयातील सन 2025-26 च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी.

Digitally signed by Shriram Mahadu Panzade

( श्रीराम पानझाडे)

शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 2. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे


या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . 


Pls subscribe for more educational video.


 watch more and full videos


youtube.com/@rajangarud


https://rajangarud.com


https://www.facebook.com/rajan.garud/


https://www.instagram.com/?hl=en


https://twitter.com/RAJANGARUD2


join whatsapp group here 👉👉  


https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEccs8hjqOmZ

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال