📢 खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ;
१ जुलै २०२५ पासून लागू होणार !
सदर महागाई भत्ता वाढ रोखीने मिळणार ...
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पत्र कर्मचारी तसेच असुधारीत वेतन संरचनेत (६व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या आणि असुधारीत वेतन संरचनेत (५ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पत्र कर्मचाऱ्याना मंजूर करण्यात येणान्या महागाई भत्त्याच्या दरात दि.०१ जुलै, २०२५ पासून सुधारणा करण्याबाबत. पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२५/प्र.क्र.१९/सेवा-९मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२दिनांक : २५ फेब्रुवारी, २०२६
वाचाभारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापनक्रमांक: १/४()/२०२५-E.II (B), दिनांक ६ ऑक्टोबर २०२५शासन निर्णय -राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२५ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५५% वरुन ५८% करण्यात यावा. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी.माहे जुलै, २०२५ ते ऑक्टोबर, २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च, २०२६ या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०२२५१५५४५१९१०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
MUGDHA NITIN DHURIया यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos
https://www.facebook.com/rajan.garud/
https://www.instagram.com/?hl=en
https://twitter.com/RAJANGARUD2
join whatsapp group here 👉👉
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos
https://www.facebook.com/rajan.garud/
https://www.instagram.com/?hl=en
https://twitter.com/RAJANGARUD2
join whatsapp group here 👉👉
