बदली अपडेट जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आजचा शासन परिपत्रक

 बदली अपडेट 

जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आजचा शासन परिपत्रक 



 जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आजचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022 23 जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

ग्रामविकास विभागाचे दिनांक सात एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार जिल्हाअंतर्गत बदल्या या संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरू असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्रमांक एक दोन तीन चार व पाच मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.7 येथे बदलीने पद स्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा असे नमूद आहे.

परंतु प्रत्यक्षात कालावधी नमूद करण्यात आलेला नाही यास्तव असे स्पष्टीकरण देण्यात येते की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक एक मे 2023 ते 15 मे 2023 पर्यंत कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 16 मे 2019 ते 31 मे 2023 या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी.

 

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال