समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2026 प्रवेश पत्र / हॉल तिकीट डाउनलोड करा. kendrapramukh exam 2026

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2026
 प्रवेश पत्र / हॉल तिकीट डाउनलोड करा.



 पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अपडेट  
kendrapramukh exam


तुमच्या ईमेलवर आलेला रजिस्ट्रेशन नंबर टाका 
 जन्मतारीख टाका

Captcha टाकून Login बटन वर क्लिक करा



केंद्रप्रमुख परीक्षा ही तीन आणि चार फेब्रुवारीलाच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे... 

त्यामुळे कोणत्याही चर्चेत न पडता अभ्यास करावा. आज उद्या हॉल तिकीट उपलब्ध होतीलच..



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2026 बाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे. 

परीक्षा प्राधान्य

जा. क्र. मरापप/बापवि/२०२६/२७०

दिनांक : २७/०९/२०२६

प्रति,

मा. जिल्हाधिकारी,

रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग/पुणे/सातारा/सांगली/सोलापूर, कोल्हापूर/छ. संभाजीनगर/परभणी/धाराशिव/लातूर

विषय :- जिल्हा परिषद निवडणुका दरम्यान केंद्रप्रमुख परीक्षा येत असल्याने निवडणूक प्रशिक्षणासाठी शिक्षक उमेदवारांना शिथिलता देण्याबाबत....

महोदय,

उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, दि. ५ फेब्रुवारी, २०२

६ रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद साठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक/केंद्रप्रमुखांचे तब्बल २४१० पदे रिक्त असून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील ४६०६८ शिक्षक उमेदवारांची मर्यादित विभागीय स्पर्धा ऑनलाइन परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दि. ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी ज्या १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत. त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा देखील समावेश आहे. जून २०२३ पासून केंद्र समन्वयक / केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया प्रलंबित असून, तब्बल अडीच वर्षांचा विलंब या परीक्षेसाठी विविध अपरिहार्य न्यायालयीन व प्रशासकीय कारणास्तव झालेला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने गोपनीय संगणक संस्थेमार्फत राज्यभरातील परीक्षा केंद्रांवरील संगणकांच्या उपलब्धतेनुसार ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ या दोन तारखा निश्चित केलेल्या आहेत. ज्या १२ जिल्हयांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या जिल्ह्यांमधील कार्यरत असलेल्या शिक्षक उमेदवारांना निवडणूक कर्तव्यामध्ये कोणतीही अडचणी येऊ नये, म्हणून दि. ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी या जिल्ह्यातील उमेदवारांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या नियोजनामुळे निवडणूक कार्यामध्ये कोणतीही बाधा येणार नसून दि. ४ फेब्रुवारी, २०२६ रोजीचे अंतिम प्रशिक्षण घेऊन या शिक्षकांना मतदान केंद्रावर जाता येऊ शकेल.

तथापि आपल्या जिल्ह्यामध्ये जर काही कारणास्तव ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी निवडणुकीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले असेल, तर केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना यामध्ये शिथिलता देऊन त्यांचे निवडणूक प्रशिक्षण दि.. १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात यावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. असे केल्याने आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या परीक्षार्थी शिक्षक उमेदवारांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही व त्याचबरोबर या शिक्षक उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी मिळेल व पर्यायाने कोणतेही शिक्षक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.

आदरपूर्वक....



डॉ.नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.)

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४



प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

 २) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव :-

१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

२) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व जिल्हा परिषद यांनी आपले स्तरावरून आवश्यक कार्यवाही अग्रेनीत


राज्य शासनाने केंद्रप्रमुख भरतीसाठी 50% पदोन्नतीतून व 50 टक्के विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतून पदे भरण्याबाबत शासन निर्णय केला होता व त्यानुसार विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जाहिरात काढून तसे अर्ज देखील भरून घेतले होते परंतु सदर प्रकरणी शासनाने अधिसूचना निर्गमित केलेली नसल्यामुळे सदर प्रक्रिया पूर्ण झाली नाही.


दिनांक ६ ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने त्याबाबत सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली आहे ती पुढील प्रमाणे.


सदर अधिसूचनेवर हरकती व सूचना दिनांक 5 सप्टेंबर 2024 पर्यंत ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबईला पाठवायचे आहेत.


सदर सुधारित अधिसूचनेनुसार


१. केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती, एकतर


(१) पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, पात्रतेच्या अधीन राहून, ज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.


(२) शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार, त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने,राज्य शासनाने केंद्रप्रमुख भरतीसाठी 50% पदोन्नतीतून व 50 टक्के विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतून पदे भरण्याबाबत शासन निर्णय केला होता व त्यानुसार विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जाहिरात काढून तसे अर्ज देखील भरून घेतले होते परंतु सदर प्रकरणी शासनाने अधिसूचना निर्गमित केलेली नसल्यामुळे सदर प्रक्रिया पूर्ण झाली नाही.



(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए. किंवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. ची पदवी धारण केलेली आहे: 

(ब) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक
(प्राथमिक) म्हणून जिल्हा परिषदेत किमान सहा वर्षे अखंड सेवा केली आहे; २. केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.


३. (१) केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ मधील तरतुदींनुसार किंवा याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम, आदेश किंवा इतर संसाधनानुसार लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक आहे. 

(२) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर केल्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक मुले असलेली व्यक्ती या नियमांनुसार नियुक्त केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. 

(३) या नियमानुसार नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीची शासन सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, अशा व्यक्तीस नियुक्तीच्या वेळी किंवा त्यांनतर त्याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्यास, ती या पदावर सेवा चालू ठेवण्यासाठी अपात्र ठरेल.

४. केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल.


५. केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती;


(१) तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल :

(२) तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून काम करत आहे त्या जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही.


6. या नियमान्वये केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम, आदेश किंवा कोणतीही संसाधने लागू राहतील.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


सीमा जाधव,

 नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल........... या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . Pls subscribe for more educational video. watch more and full videos youtube.com/@rajangarud https://rajangarud.com https://www.facebook.com/rajan.garud/ https://www.instagram.com/?hl=en https://twitter.com/RAJANGARUD2 join whatsapp group here 👉👉 https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEccs8hjqOmZ

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال