राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर, २०२५ अधिसूचना.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक १२ सप्टेंबर, २०२५ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
सोबतः माहितीपत्रक
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४.
प्रसिध्दी निवेदन
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)
२०२५-२६ इ. ८ वी साठी
सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्याथ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
१. अर्ज करण्याची पध्दत दिनांक १२/०९/२०२५ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
२. पात्रता :-
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
३. विद्यार्थ्यांची निवड : विद्याथ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
५. परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी २ विषय असतील, प्रत्येक पेपरसाठी A,B,C,D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT): ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात,
b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण-३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a. सामान्य विज्ञान ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
c. गणित २० गुण.
६. माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील, योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या: अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी
निवड केली जाते. दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल,
८. शुल्क : परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.
९. निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल, जिल्हयांनी, शाळांनी व विद्याथ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.
१०. शिष्यवृत्ती दर:- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/-
(वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.
> शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.
> इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत्त, (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
> सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.
११. अनधिकृततेबाबत इशारा -
शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४.
संपूर्ण माहितीपत्रक डाउनलोड करा
Download
माहितीपत्रक
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २९ डिसेंबर २०२५
१. योजनेची उद्दिष्टे :-
a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे,
b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे,
c) विद्याथ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी.
२. परीक्षेचे स्वरुप केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
३. पात्रता :-
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे, नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सम २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
४. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत दिनांक १२/०९/२०२५ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी, विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कैन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी, सविस्तर माहिती परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://mscenmms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
शुल्क :- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.
महाराष्ट्र राआह परीक्षा परिषद पुणे द्वारे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस 2024 परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यासाठीच्या सूचना पुढील प्रमाणे देण्यात आल्या आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना
खाली नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१ शाळा नोंदणी करणे, School Profile, Principal Details व शाळा संलग्नता शुल्क ऑनलाईन भरणे.
२ विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व ऑनलाईन अर्ज भरणे.
३ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे.
A. शाळा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे
परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळाच्या Homepage च्या लिंक वर क्लिक करुन दिसणाऱ्या पेज च्या डाव्या बाजूस असलेल्या उपक्रम मधील शाळा नोंदणी (School Registration) या Tab वर क्लिक करा.
उघडलेल्या पेजवरील पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून शेवटी असलेल्या नवीन नोंदणीला जा (Click here to Register) व अर्ज भरा या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर उघडलेल्या पेजवरील Click here to Register या Tab वर क्लिक करा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
१ शाळेचा युडायस (UDIES) नंबर अचूक नमूद करणे.
२ शाळेचा युडायस (UDIES) नंबर नमूद केल्यानंतर SARAL वरून आलेली (Auto generate झालेली) शाळेची सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करावी. जी माहिती आलेली नसेल/अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.
३ शाळेचे माध्यम (School Medium) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
४ शाळेचा Area (Rural/Urban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
५ शाळेचा Syllabus Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
6 School Type Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
७ शाळेचा टेलीफोन नंबर अचूकपणे नमूद करा.
८ शाळेत निवासी सोय असल्यास Yes व नसल्यास No हा पर्याय Hostel Facility Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
९ आपला शाळेचा Email ID अचूकपणे नमूद करा.
१० शाळेचे पूर्ण पत्ता अचूक पणे नमूद करा, ठिकाण लँडमार्क रस्ता पेठ गाव तालुका, जिल्हा व पिनकोड (६ अंकी) या अचूकपणे नमूद करा
११ पिनकोड नमूद करताना तो ४ ने सुरु होईल याची खात्री करा.
१२ संपर्क माहितीमध्ये मुख्याध्यापकांचा दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूक नमूद करा.
१३ तालुका, जिल्हा व पिनकोड SARAI, वरून Auto Generate झालेला आहे.
१४ मुख्याध्यापकांची माहितीः मुख्याध्यापकांचे नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, पर्यायी संपर्क क्रमांक अचूकपणे नमूद करा.
१५ Upload Principal's /Head Master's Photo with Signature: मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती ८.५ सें.मी. x ४.५ सें.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb ते १०० kb या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.
१६ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Preview या बटनावर क्लिक करा.
१७ एकदा भरलेली शाळेची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच असेल.
१८ Submit बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- भरण्यासाठी Proceed to pay हा पर्याय उपलब्ध होईल.
१९ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा.
२० Proceed to pay या बटनावर क्लिक केल्यास ऑनलाईन पद्धतीने शाळा संलग्नता शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम पिन व UPI असे पर्याय उपलब्ध होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन शुल्क भरावे.
२१ चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही, याची नोंद घ्यावी.
२२ ऑनलाईन शुल्क भरतेवेळी इंटरनेट, वीज जाणे यामुळे शुल्क जमा न झाल्यास पुन्हा लॉगीन करुन शुल्क ऑनलाईन भरावे.
२३ शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर, ईमेलवर व मोबाईलवर Payment Successful असा मेसेज येईल. आणि Transaction Details स्क्रीनवर दिसतील.
२४ Transaction Details Download करा व Print काढा.
२५ आपण नमूद केलेल्या मुख्याध्यापकांचा Email ID व मोबाईल वर शाळा लॉगीनचे User Name व Password प्राप्त होईल. २६ शाळा नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही.
B. School Profile ची माहिती भरणे.
१ शाळेच्या Email ID व मोबाईलवर प्राप्त झालेल्या User Name व Password द्वारे लॉगीन करावे.
२ लॉगीन केल्यांनतर School Profile ची माहिती भरण्याबाबतचा फॉर्म उपलब्ध होईल.
३ सदर फॉर्म मध्ये School UDISE Code, School Name, Principal/Head Master Mobile No. व Email या क्रमाने सदरच्या शाळेची माहिती automatically येईल. जी माहिती आलेली नसेल/अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.
४ शाळेचे माध्यम (School Medium) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
५ शाळेचा Area (Rural/Urban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
६ शाळेचा Syllabus Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
७ School Type Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
८ शाळेचा टेलीफोन नंबर अचूकपणे नमूद करा.
९ शाळेचा पत्ता- ठिकाण/लँडमार्क, गाव, अचूकपणे नमूद करा.
१० तालुका, जिल्हा व पिन कोड SARAL वरून Auto generate झालेला आहे.
११ Upload Principal's /Head Master's Photo with Signature: मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती ८.५ सें.मी. x ४.५ सें.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb ते १०० kb या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.
१२ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Save या बटनावर क्लिक करा.
१३ एकदा भरलेली शाळेची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच असेल.
C. विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व ऑनलाईन आवेदनपत्र भरणे.
School Profile ची माहिती भरून Save या बटनावर क्लिक केल्यानंतर, School Dash board वरील बाजूस असलेल्या Student Registration Form या बटनावर विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा.
२ Student Registration Form या बटनावर क्लिक केल्यानंतर Student Registration है पेज उघडेल.
Student Details: (प्रथम विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे.) UDISE Code Automatically येईल.
२ Standard Automatically येईल (8 th).
३ विद्यार्थी विनाअनुदानित शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा
४ विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा
५ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
६ विद्यार्थी शासकीय वसतिगृह सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शेक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेय का? लाभ घेत असेल तर yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूक पाने निवडा.
७ विद्यार्थी सैनिक शाळेत शिकत आहेय का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
< Upload Student Photo with Signature: विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती - ८.५ सें.मी. x ४.५ से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb १०० केबी या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.
९ विद्यार्थ्याचे आडनाव, नाव, वडीलांचे, आईचे अचूक नमूद करावे.
१० विद्यार्थ्याचे Gender Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
११ विद्यार्थ्यांची जन्मतारीख DD, MM, YYYY या प्रमाणे अचूकपणे नमूद करावे. Online जन्मतारीख निवडताना सर्वप्रथम वर्ष, महिना आणि जन्मतारीख याप्रमाणे निवडावे.
१२ आधार कार्ड असल्यास आधार क्रमांक अचूकपणे नमूद करा. आधार कार्ड नसल्यास सदरचा रकाना रिकामा सोडावा.
१३ विद्यार्थीच्या इ. ७ वी ची श्रेणी / Grade dropdown list मधून निवड करावी. आणि इ. ७ वी मिळालेले टक्के नमूद करावे.
१४ विद्यार्थी राहत असलेला विभाग (Area) शहरी/ ग्रामीण (Rural/Urban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
१५ Differently Abled /Disabled मध्ये दिव्यांगत्व Dropdown लिस्ट मधून दिव्यांग असेल तर Yes निवडा. व विद्यार्थी दिव्यांग नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
१६ Yes, पर्याय निवडला असेल तर Type of Disability मध्ये दिव्यंगत्व ड्रॉपडाउन लिस्ट मधून अचूकपणे निवडा विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्रावर नमूद असलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी नमूद करावी.
१७ Need a Writer for Exam या रकान्यात विद्यार्थ्यास Writer पाहिजे असेल तर Yes व writer पाहिजे
18;नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूक पाने निवडा.
१९ Caste Name पुढील रकान्यात आपली जात नमूद करा. (उदा. माळी, सोनार, शिंपी..... विद्यार्थ्यांची जात संवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
२० भारत सरकार यांचे No. ३६०३९/१/२०१९ -Estt (Res) दि. ३१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार Economically Weaker Section (EWS) च्या आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल तर Yes हा पर्याय आणि घायवयाचा नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा आरक्षणाचा लाभ सक्षम अधिकारयाचा EWS प्रमाणपत्र मुख्याध्यापकांकडे जमा करणे आवश्यक आहे
२१ विद्यार्थाचा राहत असलेल्या ठिकाणाचा पूर्ण पत्ताः ठिकाण लँडमार्क, गाव, तालुका व जिल्हा या क्रमाने अचूकपणे नमूद करावा.
२२ राहत असलेल्या ठिकाणाचा ६ अंकी पिनकोड अचूकपणे नमूद करावा.
२३ राज्यस्तर परीक्षेसाठी MAT आणि SAT या विषयासाठी माध्यम Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. २४ Bank Account Information या रकान्यात विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते असेल तर Yes व बँकेचे खाते नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
२५ Bank Account Information Yes पर्याय निवडला असेल तर Bank Account Number, IFSC code, Name of Bank, Branch and Full Address of Branch अचूकपणे नमूद करा.
संपूर्ण माहिती पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . Pls subscribe for more educational video. watch more and full videos
join whatsapp group here 👉👉
join whatsapp group here 👉👉