आजच vote करा.World's Best School स्पर्धेमध्ये आपली जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर वारे सरांची शाळा. जाणून घेऊया आणि मतदान करूया

 https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649


🙏 *- वरील लिंक वर मतदान करण्यासाठी वारे गुरुजी यांचे आवाहन -* 🙏


*World's Best School स्पर्धेमध्ये आपली जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर तालुका खेड जिल्हा पुणे ही शाळा जगात टॉप टेन मध्ये आलेली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशातील ही एकमेव शाळा टॉप टेन मध्ये आहे. आणि तीसुद्धा सरकारी जिल्हा परिषदेची शाळा आहे.* 


*या शाळेच्या यशाने सरकारी शिक्षण व्यवस्थेतील घटकांना आत्मविश्वास मिळेल की सरकारी शाळा सुद्धा जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या आणि खाजगी शाळांच्या तोडीस तोड कामगिरी करत आहेत. आणि त्यांना पाठीमागे टाकून सरस ठरत आहेत. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात ही शाळा जगात टॉप 1 होणे ही आपल्या सरकारी शिक्षण व्यवस्थे साठी आणि देशाच्या अभिमानाची गोष्ट ठरणार आहे. परंतु त्यासाठी पब्लिक वोटिंगची अट आहे. (त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर सर्वाधिक मतदान करावे लागेल)*


*आम्ही आमच्या प्रामाणिक कामाच्या बळावर शाळेला इथपर्यंत पोहचवले आहे. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात आम्हाला मतदानाच्या समर्थनासाठी खूप लोकांशी संपर्क साधावा लागेल. तथापि, ग्रामीण दुर्गम शाळेत काम करताना, आमचा इतका फारसा संपर्क असण्याची शक्यता कमी आहे. ही आमची मर्यादा आहे.*


*पण आम्हाला प्रामाणिकपणे वाटते की आमच्या मर्यादांमुळे एक भारतीय शाळा आणि पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेत भाग घेणारी सरकारी शाळा वगळली जाऊ नये.*


*मी तुम्हा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याची आणि ही प्रक्रिया आपल्या हातात घेण्याची मनापासून विनंती करतो. आपण आपले, कुटुंबाचे, मित्रमंडळींचे व पालकांचे मतदान करून या शाळेला जगात सर्वोत्तम करण्यास मदत करावी. मला विश्वास आहे की एक भारतीय शाळा आणि सरकारी शाळा जागतिक स्पर्धेत अव्वल स्थानावर राहिल्याने आपल्या समाजात आणि सरकारी शिक्षण व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल होतील.*

                            - वारे गुरुजी...




*✅ वोटिंगसाठी स्टेप्स:*

*1. 📲 खालील QR कोड स्कॅन करा*

*(किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करा)*

*2. 📝 आपली माहिती भरा:*

*नाव*

*आडनाव*

*व्यवसाय*

*✉️ ई-मेल आयडी*


*3. 🔔 माहिती भरल्यानंतर "Vote Validate" झाल्याचा notification येईल.*

*4. 📥 त्यानंतर आपल्या ई-मेलवर एक वोट कन्फर्मेशन मेल येईल. तो ई-मेल उघडून Confirm Vote करा.*

*5. ⚠️ जर ई-मेल "Inbox" मध्ये दिसत नसेल तर "Spam" फोल्डर तपासा.*

*कधी कधी मेल Spam मध्ये जातो.*


वारे सरांच्या शाळेला म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेला बनवूया जागतिक 

स्तरावर 1 नंबर ची शाळा.त्वरा करा आपले मोलाचे मत आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال