आता अनुत्तीर्ण व अनुपस्थित प्रशिक्षणार्थ्यांचे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत होणार
सूचना SCERTM
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाबाबतच्या सूचना दि ०७/१०/२०२५
दिवाळीच्या सुट्टीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/ प्रशिक्षण, दि. २०/०७/२०२१
२) या कार्यालयाचे दिनांक २१.०५.२०२५ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयांन्वये वरिष्ठ व निवड प्रशिक्षण दिनांक ०२.०६.२०२५ ते दिनांक १२.०६.२०२५ या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर घेण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी काही प्रशिक्षणार्थी विविध कारणांमुळे अनुपस्थित होते. अशा 5,527 अनुपस्थित प्रशिक्षणार्थीचे व प्रशिक्षणोत्तर चाचणीमध्ये अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर दिवाळीच्या सुट्टीत दिनांक २५.१०.२०२५ ते दिनांक ०३.११.२०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पात्र प्रशिक्षणार्थीना द्यावयाची सूचना :- १) सदर प्रशिक्षणार्थीनी यापूर्वी नोंदणी केल्यामुळे पुन्हा नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
२) अनुपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीच्या गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण दिनांक २५.१०.२०२५ ते ०३.११.२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात यावे.
३) वरीष्ठ व निवड प्रशिक्षणार्थी पुस्तके यापूर्वीच वाटप करण्यात आली असल्याने त्यांची छपाई करण्यात येणार नाही. सर्व प्रशिक्षणार्थी यांना यापूर्वीच पुस्तके प्राप्त झाल्याची खात्री जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी करावी.
४) प्रशिक्षण नियोजन डायट प्राचार्य यांनी दि. ९ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावे,
५) राज्यस्तरीय TOT प्राचार्य तसेच व अधिव्याख्याता/ केंद्र समन्वय / अधिव्याख्याता व सुलभक यांचे समवेत दि ९ ऑक्टोंबर रोजी १ दिवशीय ऑन लाईन स्वरूपात घेण्यात येईल.
६) दिनांक ०२.०६.२०२५ ते दिनांक १२.०६.२०२५ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणाच्यर्थ्यांनी दिनांक २५.१०.२०२५ ते दिनांक ०३.११.२०२५ या कालावधीमध्ये पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणोत्तर चाचणी द्यावी (कोणतेही शुल्क न भरता).
७) कला व क्रिडा शिक्षकाचे तालुकास्तरीय ७ दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत (दिनांक २५/१०/२०२५ ते दिनांक ३१/१०/२०२५ एकूण ०७ दिवस) होईल त्यांच्या मुल्याकन व उपस्थिती बाचतच्या नोंदी संबंधित जिल्ह्याने ठेवाव्यात, तसेच विभाग स्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी कला व क्रिडा शिक्षकांना दिनांक ३१/१०/२०२५ रोजी प्रशिक्षण कार्यमुक्त करण्यात यावे,
८) कला व क्रीडा शिक्षकाचे विभागीय प्रशिक्षण दिनांक ०१/११/२०२५ ते दिनांक ०३/११/२०२५ या कालावधीत विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याचेमार्फत आयोजित केले जाईल, संबधित विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या विभागातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
९) अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यचे १० दिवसांचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मार्फत आयोजित केले जाईल याबाबतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना निर्गमित करणेत यावेत.
संदर्भ क्रमांक २ च्या पत्रानुसार सर्व प्रशिक्षण सूचना लागू राहतील. तसेच प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक सूचना वेळोवेळी प्रशिक्षण संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
Digitally signed by
RAHUL ASHOK REKHAWAR Date: 07-10-2025
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहिती व कार्यवाहीस्तव-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्च)
३ शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व)
४ शिक्षण निरीक्षक, मुंबई, (पश्चिम दक्षिण/उत्तर)
६. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
.jpg)