ऑनलाइन बदली पोर्टल पती पत्नी एकत्रीकरण 1 युनिट ( संवर्ग ३ व ४ ) संदर्भात महत्वाची माहिती


 ऑनलाइन बदली पोर्टल 

पती पत्नी एकत्रीकरण 1 युनिट ( संवर्ग ३ व ४ )

 संदर्भात महत्वाची माहिती  

  

१ युनिट स्पष्टीकरण

                     👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥

👉शिक्षकांनी १  युनिट करिता अर्ज करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे. 

 1) बदली अधिकार पात्र शिक्षक (संवर्ग 3) व बदली पात्र शिक्षकच (संवर्ग 4) वन युनिट अंतर्गत अर्ज करू शकतात. 

2) 1 युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.

 3) पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली देण्यात येईल.

4) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय. 

5) या ठिकाणी आपण लक्षात ठेवावे की जो शिक्षक वन युनिट करिता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत. 

6) वन युनिट करिता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंती क्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशाच शाळा प्राधान्याने निवडाव्यात त्यामुळे दोघांनाही निश्चितच एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. 


👉एक युनिट करिता अर्ज करण्याकरिता खालील शिक्षक पात्र ठरतात. 

👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥

1) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास. 

2) दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास. 

3) एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र. 

4) एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात. कितीही सेवा झालेला जोडीदार. 

5) एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार. 


📍1) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास. 📍


💢बदली अधिकार पात्र टप्प्यातून जर आपण एक युनिट म्हणून बदली करिता पसंती क्रम देत असाल तर  फक्त 1 युनिट करिता सेवा जेष्ठ शिक्षकालाच पसंतीक्रम द्यावा लागेल जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारल्या जाणार नाही. 


💢 बदली अधिकार पात्र शिक्षकांनी एक युनिट मधून बदली करिता पसंती क्रम दिला व दोघांनाही त्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही. परंतु संबंधित  बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र असल्यास त्यांना बदली पात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील. 

💢 कृपया या ठिकाणी वरील अतिशय महत्त्वाचा बदल पोर्टलमध्ये करण्यात आलेला आहे त्याकरिता शिक्षकांनी जर आपल्याला पूर्णता शाश्वती एक युनिट मधून शाळा मिळण्याची असेल तरच एक युनिट मधून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर दोघांचीही बदली होणार नाही.  


                   📍 2) दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास. 📍


💢 जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल.


💢 बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.


💢 एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला एक युनिट अंतर्गत शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना त्यांनी दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यामध्ये शाळा मिळेल

            📍3) एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र. 📍

वन युनिट करिता अर्ज करणारा एक शिक्षक बदली अधिकार पात्र असेल व दुसरा शिक्षक बदलीस पात्र असेल तर वन युनिट करिता बदली अधिकार पात्र शिक्षकाला अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाचा अर्ज याठिकाणी स्वीकारल्या जाणार नाही. 



💢 बदली अधिकार पात्र शिक्षकाने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार दोघांनाही शाळा मिळाली नाही तर या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकांची बदली होणार नाही परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे संबंधित शिक्षकाला बदली पात्र टप्प्यावर पसंती क्रम देण्याची संधी मिळेल. 


📍4) एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार. 📍


💢  एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली अधिकार पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही. 


💢 वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली अधिकार पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकाला 1 युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल. 


💢 बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांचीही बदली होणार नाही. 


📍5) एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार. 📍


💢 एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही. 


💢 वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली पात्र शिक्षकाला 1 युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल. 


💢  दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल या ठिकाणी जोडीदार बदलीस पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारल्या जाणार नाही. 


💢  पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही.

एक युनिट म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही एका शाळेवर दोन जागा असतील तर अशा ठिकाणी दोघांनाही बदली देण्याचा प्रयत्न सिस्टीम करेल अन्यथा आपण दिलेल्या 30 शाळांच्या पसंतीक्रमामधून दोन शाळांवर दोघांनाही बदली देण्याचा सिस्टीम प्रयत्न करेन वरील दोन्ही प्रकारातून आपणास बदली देता आली नाही तर सिस्टीम ज्या शिक्षकांनी 1 युनिट करिता अर्ज केलेला आहे त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जाईल. 


वन युनिटचा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना वन युनिटचा लाभ घेणे फायद्याचे ठरेल कारण यामध्ये सेवा जेष्ठ शिक्षकांबरोबर सेवा कनिष्ठ शिक्षकांना शाळा मिळू शकतात तसेही आपण दोघेही वैयक्तिक बदली पात्र मधून पसंती क्रम देणार आहोतच. 


पती-पत्नीमध्ये सेवा जेष्ठतेचा खूप फरक असल्यास वन युनिटचा लाभ घेणे अतिशय फायद्याचे ठरते. 


💢 वन युनिट मध्ये पसंती क्रम भरताना आपणास वन युनिट मध्ये पसंती क्रम भरायचे असल्यास do you want to apply as one unit या प्रश्नाचे उत्तर Yes निवडून प्राधान्यक्रम भरावा. 


💢 शेवटी प्राधान्यक्रम सबमिट केल्यानंतर दोघांनाही ओटीपी द्यावे लागतील. 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال