संवर्ग 2 बदली याद्या प्रसिद्ध! बदली पोर्टल लिंक. - ऑनलाइन बदली पोर्टल OTT TTMS Online Badali Portal Cadre 2 Transfer list Update 2025

 संवर्ग 2 बदली याद्या प्रसिद्ध! बदली पोर्टल लिंक. - ऑनलाइन बदली पोर्टल 
OTT TTMS Online Badali Portal Cadre 2 Transfer list Update 2025



    👉

बदली अपडेट

*👉विशेष संवर्ग भाग 2  मधील  बदली झालेल्या शिक्षकांची यादी
मा मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने  दि.25.07.2025 रोजी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

*👉बदली अधिकार पात्र भाग 3 मधील शिक्षकांना बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा.      दि. 26. 07. 2025 ते दि. 29.07.2025  अखेर 4 दिवस उपलब्ध असण्याची शक्यता आहे. 

*👉आज दि.25. 07. 2025 रोजी सुधारित रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. 
संवर्ग 3 पसंतीक्रम मोबाईलवर कसा भरावा

संजय नागे दर्यापूर
9767397707

दि 25 जुलै 25

✳️ बदली प्रक्रिये विषयी काही अडचण असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता.

➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांची बदली प्रक्रिया 25 जुलै ला आटोपलेली आहे संवर्ग 2 च्या बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या 25 जुलै ला मा. CEO/ EO लॉगिनला संध्याकाळपर्यंत अपलोड होतील व त्या लगेच प्रसिद्ध करण्यात येतील.

➡️ तसेच आपली बदली कोणत्या शाळेत झाली ती माहिती पोर्टलवर intra District या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर transfer order या ऑप्शनवर दिंनाक 25 जुलै ला आपणास उपलब्ध करण्यात येईल.

➡️ तसेच सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी  पोर्टलवर जाहीर करण्यात येईल सुधारित रिक्त जागांची यादी मा. Ceo यांच्याकडून आज अपलोड झाल्यास उद्यापासून दिनांक 26 जुलै 25 ते 29 जुलै 25 दरम्यान बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली करिता प्राधान्यक्रम भरण्याकरिता पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

काही अपरिहार्य कारणास्तव तारखांमध्ये बदल होऊ शकतो.

✳️ बदली अधिकार पात्र शिक्षक शंका समाधान.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या अवघड क्षेत्रातील रुजू दिनांक वर करण्यात येतात.
➡️  बदली अधिकार पात्र शिक्षकांना सुधारित रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातात.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फार्म सबमिट होणार नाही.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर होकार (Yes) किंवा नकार (No) देण्याची सुविधा उपलब्ध आहे.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक जर बदली पात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे अन्यथा आपली बदली बदली टप्प्यावर करण्यात येईल.

➡️ बदली पात्र असलेल्या बदली अधिकार पात्र शिक्षकांनी नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरावा लागेल.

➡️  ज्यां बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पाहिजे असल्यास त्यांनी होकार भरून पसंतीक्रम भरावेत त्यांची त्यांच्या पसंती क्रमाने बदली करण्यात येईल.
➡ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमातील जर एकही शाळा पोर्टलला देता आली नाही तर असे शिक्षक बदली पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.

➡️ ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली नको असेल त्यांनी पोर्टलवर नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला तर त्यांची बदली होणार नाही.

✳️ बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पत्ती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल.

➡️ बदली अधिकार प्राप्त टप्प्यावर चा लाभ घेताना दोघांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.

➡️ पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत एक युनिटचा लाभ घ्यायचा असल्यास दोन्हीही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण असणे आवश्यक आहे.शैक्षणिक कोर्सशैक्षणिक कोर्स

➡️ बदली अधिकार प्राप्त टप्प्यावर युनिट चा लाभ घेताना जोडीदार बदली अधिकार प्राप्त, बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त नसेल किंवा बदली पात्र नसेल तरीही घेता येतो.

➡️ वन युनिट अंतर्गत प्राधान्यक्रम देताना कोणतेही तालुक्यातील प्राधान्यक्रम देऊ शकतात.

➡️ एक युनिट चा लाभ घेताना जोडीदाराला सेवेची अट नाही.

➡️ एक युनिट अंतर्गत बदली घेताना फक्त जो शिक्षक एक युनिट करिता अर्ज करतो* त्यांच्याच प्राधान्यक्रमातून  दोघांनाही शाळा दिल्या जातात.

या ठिकाणी जोडीदाराला अर्ज करण्याची गरज नाही.

➡️ मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.

✳️ पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता.

✳️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा.

https://ott.mahardd.com/


➡️ वरील लिंक वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.

➡️ मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे ऑप्शन दिसतील . त्यापैकी आपण "Intra district" या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील "application form" हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा.

➡️ Entitle application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती स्क्रीनवर दिसेल त्यावर.

शिक्षकाचे नाव.

आडनाव.

शाळेचा यु डायस नंबर.

शिक्षकाचा शालार्थ आयडी.

ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.

➡️ वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही.

या ठिकाणी आपल्याला होकार किंवा नकार बॉक्समध्ये नोंदवावा लागेल.

➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल.

पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर.

➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी 30 प्राधान्यक्रम किंवा 30 पेक्षा कमी असल्यास जेवढ्या जागा शिल्लक आहे तेवढ्या निवडाव्यात या संदर्भात सूचना दिसेल.

➡️ याचाच अर्थ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या शाळांपैकी 30 प्राधान्यक्रम अथवा 30 पेक्षा कमी प्राधान्यक्रम उपलब्ध असल्यास उपलब्ध असलेले प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे.

➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी.

➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील.
किती मंजूर पदे.

किती कार्यरत पदे.
शाळेतील रिक्त पदे.
समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे.
बदली पात्र शिक्षकांची पदे.
ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील.
➡️ Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल.
➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.
➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी.
➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.
➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save करावी.
➡️ *अशा पद्धतीने आपणास  प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.
➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
➡️ संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल.
➡️ तसेच आपणास आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही बदल करायचं असल्यास आपण आपला फॉर्म मुदतीपूर्वी withdraw करू शकता व पुन्हा भरू शकता.
➡️ वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. 

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال