संवर्ग 4 बदली याद्या CEO लॉगिनला उपलब्ध I बदली पोर्टल OTT TTMS Cadre 4 list Update 2025

 

व्हिंसिस कडून आलेला मेसेज

मुंबई मध्ये अती मुसळधार पाऊस असल्याने सर्व शासकीय निमशासकीय खाजगी ऑफिस यांना सुट्टी देण्यात आलेली आहे...

   त्यामुळे जर otp न येणे वगैरे सारख्या काही समस्या निर्माण झाल्यास संध्याकाळी 6 वाजल्यानंतर नेटवर्क प्रोव्हायडर कडून कोणताही टेक्निकल सपोर्ट मिळणार नाही......

    असे नेटवर्क प्रोव्हायडर यांना कॉल केला असता समजले आहे......

   तरी सर्व नोडल अधिकारी यांनी आपल्या शिक्षकांना ज्यांनी अद्याप फॉर्म भरला नाही किंव्हा ड्राफ्ट मध्ये ठेवलेला आहे त्यांनी आपला फॉर्म संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरून  सबमिट करावा अशा सूचना द्यावेत......
 फॉर्म वेळेत सबमिट न झाल्यास फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ मिळणार नाही याची दक्षता घेऊन वेळेत फॉर्म भरावा ही विनंती.

अंतिम व शेवटचा दिवस....

एलिजिबल टू, विस्थापित फेरी, दिवस चौथा, आज दि.19/8/2025
(अंतिम मुदत दिं 19 ऑगस्ट 2025)

    शाळांची यादी एकदा पाहून/लिहून घ्या. पाहून अभ्यासपूर्ण क्रम ठरवा. विचारपूर्वक शाळा निवडा. अभ्यासपूर्ण, विचारपूर्वक क्रम ठरवून,फॉर्म save करून आजच लवकर सबमिट करा.आज शेवटचा दिवस आहे.100% मुदत वाढणार नाही.

बदली पोर्टल लिंक 👇🏻


https://ott.mahardd.com




 

ELIGIBLE ROUND 2 ( विस्थापित )

 उद्यापासून सुरू होतोय त्या अर्थी आजच संवर्ग 4 बदली याद्या आणि विस्थापित याद्या तसेच सुधारित रिक्त पदे याद्या येतील.

विस्थापित शिक्षकांना फॉर्म भरण्याची मुदत... 15 ते 18 ऑगस्ट... 

  • Eligible Round 2/विस्थापित संदर्भात महत्वपूर्ण.....

  • बदली पात्र/संवर्ग-4 ची बदली प्रक्रिया दिनांक 13/8/25 पूर्ण झालेली आहे सर्व CEO  यांचे संमती पत्र Vinsys ला प्राप्त होताच  बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या आज सांयकाळपर्यंत  EO/CEO लॉगिनला उपलब्ध होतील.

  • बदली झालेल्या शिक्षकांची यादी, विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी आणि सुधारित रिक्त पदांच्या याद्या  EO/CEO लॉगिनला उपलब्ध होतील.

  • त्यानंतर लगेच बदली पात्र टप्प्यामधील विस्थापित शिक्षकांना पसंती क्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल.

  • बदली पात्र शिक्षकांमधून जे शिक्षक विस्थापित झाले अर्थातच त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत असे शिक्षक विस्थापित झालेले असतील अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मध्ये पसंतीक्रम भरावा लागेल.


  • विस्थापित राऊंडमध्ये शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवस दिलेले असतील त्यांच्या प्राधान्य क्रमामधून जर बदली मिळाली नाही तर त्यास टप्प्यावर उपलब्ध असलेल्या जागांवर सिस्टीम त्यांना बदलीने शाळा देईल.

  •  तसेच ज्या शिक्षकांनी एक युनिट मधून लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते अशा शिक्षकांचा समावेश या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक युनिटमध्ये जागा मिळू शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक आहेत त्या शाळेवर राहतील.

  • तसेच दोन बदली पात्र शिक्षकांनी एक युनिट म्हणून अर्ज केलेला असेल तर त्या दोघांच्याही बदल्या झालेल्या असतील तर अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागणार नाही.

  • किंवा त्या एक युनिट मधील ज्या शिक्षकाने अर्ज केलेला असेल त्या शिक्षकाची बदली झालेली असेल व त्यांचा बदली पात्र जोडीदार विस्थापित झालेला असेल तर अशा जोडीदाराला या टप्प्यामध्ये पसंती क्रम भरावा लागेल.

  •  किंवा एक युनिट मधील दोन्हीही बदली पात्र पती-पत्नी शिक्षक विस्थापित झालेले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंती क्रम द्यावा लागेल.


  •  किंवा संवर्ग एक व संवर्ग दोनच्या ज्या शिक्षकांनी होकार दिलेला होता व त्यांना संवर्ग व संवर्ग दोन मधून बदली मिळाली नाही असे शिक्षक बदली पात्र असतील व त्या शिक्षकांनी संवर्ग चार टप्प्यांमध्ये फॉर्म भरलेला नसेल अश्या शिक्षकांना विस्थापित टप्प्यामध्ये फॉर्म भरता येईल.

  • ज्या बदलीपात्र शिक्षकांनी बदली पात्र टप्प्यावर पती-पत्नी वन युनिटचा लाभ  घेतलेला असेल व असे शिक्षक विस्थापित झालेले असतील तर पती-पत्नी शिक्षकांना पुन्हा विस्थापित राऊंड मध्ये वन युनिट मधून फॉर्म भरता येईल(जर बदली पात्र फेरीत पसंतिक्रम न मिळाल्यास/विस्थापित झालेले असल्यास.

  • आतापर्यंत झालेल्या सर्व टप्प्यातील बदली झालेल्या शिक्षकांची नावे जर अवघड क्षेत्राचा रिक्त जागा भरणे या यादीमध्ये असतील तर त्यांची नावे वगळण्यात येतील.

  • या बदली प्रक्रियेमध्ये ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी होकार दिला व त्यांना त्यांच्या पसंती क्रमाने शाळा मिळाल्या नाहीत व असे शिक्षक बदली पात्रही नाहीत परंतु  अशा शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षे पूर्ण झालेले असतील तर त्यांची नावे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यावर निश्चित आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्र आहे अशा जिल्ह्यातील संवर्ग एकच्या शिक्षकांनी एकत्रित येऊन अवघड क्षेत्रातील जागा भरणे या यादीतील नाव कमी करण्याकरिता  निवेदन देणे गरजेचे आहे कारण आपण बदली करिता होकार दिलेला आहे अन्यथा आपली बदली अवघड क्षेत्रामध्ये होऊ शकते


  • तसेच ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक मधून होकार किंवा नकार दिलेला नसेल व अशा शिक्षकांची नावे अवघड क्षेत्राच्या यादीत आलेले असतील तर त्यांना कार्यालयाकडून  आवश्यक पुरावे जमा करण्याबाबत सूचना येतील आपण पुराव्यांची पूर्तता करताच आपले नाव अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या यादीतून वगळण्यात येईल जेणेकरून आपली बदली अवघड क्षेत्रात होणार नाही

  •  यादी प्राप्त झाल्यावर जर Status मध्ये आपल्या नावासमोर खालील Term दिसत असतील तर आपणास (Eligible Round 2) मध्ये फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे.खालील status असलेल्या शिक्षकांनी फॉर्म न भरल्यास System उपलब्ध असलेल्या जागेवर आपणास बदली देऊन टाकेल.



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال