शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५ ऑनलाइन शिक्षण कट्टा नोंदणी फॉर्म उपलब्ध ....

 शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई
शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५  
ऑनलाइन शिक्षण कट्टा



 सस्नेह निमंत्रण, 


 शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्यावतीने शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५ या विषयावर शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ या दिवशी दुपारी ४ते सायं.६ या वेळेस ऑनलाइन शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला आहे.


 नवीन शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणीच्या दृष्टीने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा 'शालेय शिक्षण अभ्यासक्रम प्रस्तावित मसुदा-२०२५'चा पाठ्यक्रम मसुदा राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र, राज्य पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. हा मसुदा आपणांस पुढील लिंक क्लिक करून  वाचायला मिळेल. 


https://drive.google.com/drive/folders/1vbeuXI0zE5h6-DqzclaF4ReCl157RtyL



  हा प्रस्तावित मसुदा जनतेच्या अभिप्रायांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. दिनांक २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत या आराखड्यावरील सूचना एसीईआरटीकडे पाठवायच्या आहेत.शिक्षण विकास मंचकडून या सूचना शासनाकडे पाठवायच्या आहेत. याचे औचित्य साधून या राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षण कट्टयाचे आयोजन केले आहे. हा  शिक्षण कट्टा शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.


 या कट्ट्यावर शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना सहभागी होता येईल. ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पुढील लिंक वर जाऊन गुगल फॉर्म भरून नोंदणी करावी.


https://forms.gle/fyaZXAdTkRHoJa9U7

फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर व्हॉट्सअप लिंक येईल, ती क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा. पुढील सूचना व्हॉट्सअप ग्रुप वर दिल्या जातील.


 सदरील शिक्षण कट्टा पुढील लिंकवर- https://www.facebook.com/share/1WbQ4aMb4c/

 लाईव्ह पाहता येईल.


डॉ. माधव सूर्यवंशी,

 मुख्य समन्वयक,

 शिक्षण विकास मंच,

 यशवंतराव चव्हाण सेंटर.


 योगेश कुदळे,

 शिक्षण विभाग प्रमुख,

यशवंतराव चव्हाण सेंटर.


अधिक माहितीसाठी संपर्कध्वनी

 (संजना पवार-82914 16216)


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال