ग्रहण एक वैज्ञानिक सत्य !!!
ग्रहणासंबधी वैज्ञानिक माहितीच्या विरोधात गैरसमज पसरविणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे.!
आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री आपल्या पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्र हा लालसर अंधुक दिसणार आहे.म्हणजेच चंद्रग्रहण दिसणार आहे.
या खगोलीय घटनेमध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात. दर सहा महिन्यानंतर पृथ्वी , चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.
गरोदर स्त्रियांना ग्रहण पाळले नाही, तर गर्भावर परिणाम होतो असे सांगून भीती घातली जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. गर्भाचे दोष आणि ग्रहण यांचा काहीही संबंध नसतो. तरी कोणतीही भीती न बाळगता रहावे. नित्य व्यवहार करावेत. ग्रहण पाहून त्याचा आनंदही घ्यावा. झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे.
वैज्ञानिक माहितीच्या विरोधात गैरसमज पसरविणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे. चांद्रयान पाठवण्याची तयारी करणाऱ्या आपल्या देशातील जनतेने आपल्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ असण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यासाठी ग्रहण पाळणे यासारख्या अंधश्रद्धापूर्ण कृती करणे पूर्णपणे टाळले पाहिजे.
- डॉ. संजय निटवे, स्त्रीरोग तज्ञ आणि खगोल अभ्यासक, सांगली
खग्रास चंद्रग्रहण
🌕🌖🌗🌒🌔🌕
रविवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल.
रात्री ११ ते १२-२३ संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल.
खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर,तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री १२.२३ वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल.
उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल.
तरी या खगोलिय घटनेचा आनंद जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा
..........................................
✍🏼 किशोर बोरफळे ✍🏼
🔭 खगोलअभ्यासक 🔭
🌴पालघर🌴
