शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक- सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025 चा निर्णय It is mandatory for teachers to pass the TET exam.


शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक
 
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

1 सप्टेंबर 2025



 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्थात Teacher Eligibity Test हा शिक्षण
क्षेत्रातील गुणवत्ता सुनिश्चित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी TET
उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. प्रत्यक्षात, या निर्णयामुळे सर्व शिक्षकांसाठी TET अत्यंत
महत्त्वाचा झाला आहे - नियुक्तीसाठी, सेवेत राहण्यासाठी, आणि पदोन्नतीसाठी.

  • निर्णयाचे मुख्य मुद्दे


• शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी TET पास करणे आवश्यक.

• अल्पसंख्यांक संस्थांविषयीचा प्रश्न मोठ्या बेंचकडे रेफर केला आहे.

• 5 वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना TET पास करणे आवश्यक
नाही.

• आधीच पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना पुढील 2 वर्षांत TET पास करणे
बंधनकारक.

• 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण केल्याशिवाय पुढे पदोन्नती
मिळणार नाही.

• जर १-५ साठी शिकवत असाल तर TET पेपर १ व ६-८ साठी शिकवत असाल तर
TET पेपर २ तुम्हीं राज्य शासन घेते ती TET किंवा केंद्र शासन घेते ती CTET पास
होणे आवश्यक आहे.

  • शिक्षण क्षेत्रावरील प्रभाव


या निर्णयामुळे शिक्षक नियुक्ती व पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता येईल. तसेच, सर्व
राज्यांमध्ये शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी एकसमान पात्रता निकष लागू होतील.
अल्पसंख्यांक संस्थांवरील अंतिम निर्णय मोठ्या पीठाच्या निर्णयानंतर अपेक्षित आहे.

  • निष्कर्ष


माननिय सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे.शासकीय शिक्षकांना सेवेत
सातत्यता ठेवण्यासाठी २ वर्षात TET पास होणे बंधनकारक,सोबत पदवीधर
शिक्षक म्हणून पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांना सुद्धा २ वर्षात TET ( पेपर २) पास
होणे बंधनकारक, फक्त निवृत्ती ला ज्या शिक्षकांचे ५ वर्ष बाकी आहेत, त्यांना यातून
सुट मिळालेली आहे. जे शिक्षक २ वर्षात TET पास होणार नाहीत
त्यांना, अनिवार्य (सक्तीची) निवृत्ती देऊन, प्रचलित निकषानुसार पेन्शन व इतर लाभ
देण्यात येतील. अधिक माहितीसाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वाचू
शकाल.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिक्षकांसाठी कठीण वाटू शकतो, पण शिक्षण
व्यवस्थेत गुणवत्ता टिकवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता सर्व उमेदवारांनी
TET तयारी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.



  • नेहमी विचारले जाणारे प्रश्न


प्रश्न

  • TET शिवाय पदोन्नती शक्य आहे का?👉नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.
  • अल्पसंख्यांक संस्थांवर नियम लागू होणार का?👉यावरील निर्णय मोठ्या बेंचकडे रेफर
    झाला आहे.
  • ज्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांना किती मुदत? 👉 2 वर्षांच्या आत TET पास करणे आवश्यक आहे.   
  • 5 वर्षांपेक्षा कमी  सेवेचे शिक्षक?👉त्यांना सवलत आहे.
  • या  निर्णयाबद्दल तुमचे मत खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. 
  • ही माहिती इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.










Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال