TET परीक्षा बंधनकारक आदेश अधिक्रमित जुना आदेश रद्द.१७/१०/२०२५ अधिक्रमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय (विस्तार), पहिला मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-400032.
क्रमांकः विभशा-२०२५/प्र.क्र.९१/विजाभज-२
दिनांक : २०/११/२०२५
प्रति,
संचालक,
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय - 'इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत'
"अधिक्रमित म्हणजे एखाद्या जुन्या आदेशाला, नियमाला किंवा सूचनेला रद्दबातल ठरवून त्याऐवजी नवीन आदेश, नियम किंवा सूचना लागू करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जुनी गोष्ट (उदा. शासन निर्णय, परिपत्रक) आता लागू होणार नाही आणि तिच्या जागी नवीन गोष्ट लागू होईल, असा याचा अर्थ होतो. "
संदर्भ
- १) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांचे पत्र क्र. इमाबकसं/ आशा/टीईटी/२०२५-२६/२८४५, दि.४/६/२०२५
२) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा. पुणे क्र. यांचे पत्र क्र. इमाबकसं/आशा/टीईटी/२०२५-२६/३९२२, दि.४/८/२०२५
३) शासन पत्र, क्रमांक- विभशा-२०२५/प्र.क्र.९१/विजाभज-२, दि.१७/१०/२०२५ व दि.३०/१०/२०२५.
उपरोक्त विषयावरील संदर्भाधिन शासन पत्र, क्रमांक विभशा-२०२५/प्र.क्र.९१/विजाभज-२, दि.१७/१०/२०२५ अधिक्रमित करण्यात येत आहे.
उपरोक्त विषयी शासनस्तरावरुन अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याप्रमाणे आपणास कळविण्यात येईल.
Digitally signed by Sunil Baburao Tumbare Date: 20-11-2025 14:47:57
(सुनिल तुंबारे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव
2. मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानपरिषद सदस्य
3. सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहाय्यक
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

