"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा - ३"
अभियान मूल्यांकन वेळापत्रक
जाणून घेऊया
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत.. शिक्षण आयुक्तांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ २. क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५१४२४८/२०२५, दि. ३०/१०/२०२५
सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२५ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
२/- सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि. १५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७.६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.
३/-संदर्भ क्र.१ वरील शासन निणर्यान्वये शासनाने सन २०२५-२६ मध्ये देखील "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३" या अभियानाचा कालावधी दि. ०३ नोव्हेबर २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ यादरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर अभियान राबविण्याबाबत सूचना संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.
४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र, तालुका, जिल्हा, मनपा, विभाग, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दि. १६/१०/२०२५ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.
५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल. त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. याची देखील नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.
वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपद्धतीनुसार विहित वेळापत्रकाप्रमाणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-३ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.
Digitally signed by SACHINDRA PRATAP SINGH Date: 28-11-2025 18:11:59
(सचिन्द्र प्रताप सिंह, मा.प्र.से.)
आयुक्त,
शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३" अभियान (सन २०२५-२६)
१. शाळामूल्यांकन वेळापत्रक :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा सोमवार, दि.०१/१२/२०२५ ते शुक्रवार दि. १९/१२/२०२५
ब) केंद्रस्तर/युआरसीः
दि.२०/१२/२०२५ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०९/०१/२०२६ शुक्रवार सायं.०५.०० वा. पर्यंत
क) तालुका : दि. २२/१२/२०२५ सोमवार (केंद्र/युआरसी पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि. १६/०१/२०२६ शुक्रवार सायं.०५.०० वाजेपर्यंत
ड) जिल्हा:
दि.०१/०१/२०२६ गुरुवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६
गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यत
इ) मनपाः
दि.०१/०१/२०२६ गुरुवार (ब्लॉक पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.२२/०१/२०२६
गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यत
ई) विभाग :
दि.१५/०१/२०२६ गुरुवार ते दि. २८/०१/२०२६ बुधवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
उ) राज्य : दि. २७/०१/२०२६ मंगळवार ते दि.०३/०२/२०२६ मंगळवार सायं. ०५.०० वाजेपर्यत
२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक -
विवरण
स्तरसमिती करीता लॉगइन सुविधा
गो लाईव्ह
मूल्यांकनाचा अंतिम दिनांक
२. केंद्रस्तर समिती
२०/१२/२०२५ ते ०९/०१/२०२६
३. तालुका तालुकास्तर समिती
२२/१२/२०२५ ते १६/०१/२०२६
मनपा/जिल्हा मनपा/जिल्हास्तर समिती
०१/०१/२०२६ ते २२/०१/२०२६
४. विभाग विभागस्तर समिती
१५/०१/२०२६ ते २८/०१/२०२६
५. राज्य राज्यस्तर समिती
२७/०१/२०२६ ते ०३/०२/२०२६
केंद्र सर्व: प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.
तालुका : प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली १ शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
जिल्हा : तालुक्यातील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.
मनपा : युआरसीमधील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.
विभाग : जिल्हयातील पहिली १ शाळा प्रत्येक गटाकरीता मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
राज्यस्तर : प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकामधील शाळांमधून प्रत्येक गटातील १ शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.
.jpg)