०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत आदेश
3/12/2025०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :-
१) विविध वर्तमान पत्रामध्ये छापून आलेली बातमी
२) महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांचे दि. निरंक चे निवेदन
३) मा. श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद यांचे दि.०१/१२/२०२५ चे पत्र
४) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे दि.०१/१२/२०२५ चे निवेदन
वरील विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित/ अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय निवेदन/वृत्तपत्रातील बातमीद्वारे निर्देशनास आलेले आहे.
तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्यात यावी व सदर च्या सर्व शाळांच्या निर्देशनास आणून द्यावी.
Digitally signed by
Mahesh Madhukar Palkar Date: 03-12-2025 13:48:24
(डॉ. महेश पालकर)शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तय सविनय सादर.
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos
https://www.facebook.com/rajan.garud/
https://www.instagram.com/?hl=en
https://twitter.com/RAJANGARUD2
join whatsapp group here 👉👉
https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEc
cs8hjqOmZ
.jpg)