OTT TTMS Cadre 4 list Update 2025 ऑनलाइन बदली पोर्टल संवर्ग 4 यादी कधी ?

OTT TTMS  Cadre 4 list Update 2025 

 ऑनलाइन बदली पोर्टल संवर्ग 4 यादी कधी ? 

संवर्ग 04 साठी बदली पोर्टल वर प्रोसेस रन झालेली आहे. 
आज रात्री किंवा उद्या याद्या प्रसिद्ध होतील असे समजले. 




Eligible Round 1 मध्ये 30 पसंतीक्रम भरलेल्या ज्या शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमातील शाळा मिळणार नाही, त्यांचा Eligible Round 2 मध्ये समावेश होईल. 


Eligible Round 1 मध्ये फॉर्म न भरलेल्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात किंवा स्वतःचा तालुका वगळून इतर कोणत्याही तालुक्यात Randomly बदली होईल.


Eligible Round 2 मध्ये समावेश झालेल्या शिक्षकांना पुन्हा 30 पसंतीक्रम किंवा जिल्ह्यात 30 शाळा उपलब्ध नसतील तर उपलब्ध असतील तेव्हढ्या शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल.


Eligible Round 2 मध्ये पसंतीक्रमातील शाळा न मिळालेल्या शिक्षकांची आणि या राऊंडमध्ये पसंतीक्रम न भरणाऱ्या शिक्षकांची Randomly उपलब्ध जागांवर बदली होईल.
म्हणजेच Eligible Round 2 नंतर एकही बदलीपात्र शिक्षक शिल्लक राहणार नाही.


Eligible Round 2 संपल्यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शेवटचा 7 वा राऊंड सुरु होईल.


बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया (Eligible Round-1) 13 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल.

 बदली झालेल्या शिक्षकांची यादी, Eligible Round 2 मध्ये समावेश झालेल्या शिक्षकांची यादी आणि सुधारित रिक्त पदांची यादी 13 किंवा 14ऑगस्ट रोजी EO/CEO लॉगिनला उपलब्ध होईल.


खात्रीशीर माहिती नुसार 26 ऑगस्ट पासून बदली आदेश मिळण्यास सुरवात होणार. (C&P) 


 

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال