Udise + वर इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुविधा मिळणार,,,,, MPSP चे निर्देश

Udise + वर
इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुविधा मिळणार,,,,,

 MPSP चे निर्देश 



Form SO2 Download


यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतनोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातून निर्गमित दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत मागील वर्षामध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी सुविधा तालुका/शाळा स्तरावर उपलब्ध होण्याकरिता तालुका स्तरावरील MIS-Coordinator/Operator व शाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडून विनंती करण्यात येत आहे.



त्यानुसार कळविण्यात येते की, यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांकडून Form SO२ भरून घेवून नोंदणी करण्यासाठी सुविधा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते.

 त्या फार्ममध्ये अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची मूलभूत माहिती मुख्याध्यापक यांनी भरून तालुका कार्यालयामध्ये स्वाक्षरीने सादर करावी. 

तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांनी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सदर विद्यार्थ्यांची नोंद नसल्याबाबत खात्रीकरून सदर फार्म प्रमाणीत करावा, जेणे करून विद्यार्थ्यांची माहिती दुबार होणार नाही.


तालुका स्तरावर MIS-Coordinator/Operator यांनी एकत्रित झालेल्या सर्व फार्म ची यादी तयार करून जिल्हा कार्यालयास पाठविण्यात यावे. जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची यादी एकत्रित करून राज्य कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे. त्यानंतर तालुकास्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.


(गोविंद कांबळे) 11/8/2025
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत माहितीस्तव :
१) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व).
२) श्री. सुनिल सुसरे, सरचिटणीस, "अनिल" यशोदानगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३.
शैक्षणिक प्रकाशक


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال