प्राणी / पक्षी घर दर्शक शब्द
माणसांच्या घराप्रमाणे प्राण्यांचीही राहण्याची ठिकाणे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वत:च बनवतात तर काहींची घरे नैसर्गिक असतात. त्यांच्या घरांसाठी वेगवेगळी नावे दिलेली आहेत.
1. पक्ष्यांचे घरटे
2. कोळ्याचे जाळे
3. वाघाची गुहा, डोंगरकपारी
4. गुरांचा गोठा
5. कोंबडीचे खुराडे
6. घुबडाची ढोली
7. सिंहाची गुहा
8. घोड्याचा तबेला, पागा
9. चिमणीचे घरटे
10. मुंग्यांचे वारूळ
11. हत्तीचा अंबारखाना, हत्तीखाना
12. मधमाशांचे पोळे, मोहोल
13. पोपटांचा पिंजरा, ढोली
14. माणसाचे घर
15. कावळ्याचे घरटे
16. उंदराचे बीळ
17. सापाचे वारूळ, बीळ
18. उंटाचे सांडणी पीलखाना
19. वटवाघूळ पडक्या भिंती
20. माकड झाडावर
21. मासा पाणी
22. सुगरणीचा खोपा
23. कबुतराचे खुराडे
24. कुत्र्याचे कुत्राघर
25. सशाचे बीळ
26. मेंढी मेंढवाडा
27. अस्वलाचे डोंगर कपारी
28. विंचू दगडाच्या फटीत
29. शेळी कोंडवाडा
30. बदक पाणी
31. मोर झाडावर
32. डुक्कर डुक्करवाडा
33. म्हैस गोठा